Degalur ; देगलूरमधील हातभटी अडयावर पोलीसाचा हातोडा
देगलूर, गंगाधर मठवाले| गुडगाव ताडा येथील अवैध रित्या चालत असलेल्या हातभटी दारू अडयावर पोलीसांनी छापा मारून सुमारे १ लाख ५ हजार रुपयांचे रसायन मिश्रीत दारू व साहित्य नष्ट करण्यात आले सदरील कार्यवाही अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या उपस्थितीत देगलूर पोलीसांनी केले.
याबाबत सविस्तर वॄत असे गवडगाव ताडा पूर्व येथील केवळबाई रामराव राठोड ५६ कपिल शिवाजी राठोड २६ याच्या शेताच्या सामुहिक धुऱ्यावर देशी हातभटी चे गूळ मिश्रीत आंबट उग्र वास येत असलेले ११ शे लिटरच्या क्षमतेचे ११ पलासटीकचया टाक्यात 33 हजार रुपयांचे रसायन मिश्रीत 2200 लिटर क्षमतेच्या १२ पलासटीकचया रंगीबेरंगी टाक्यात ७२ हजार रुपयांची रसायन मिश्रीत नशली पदार्थ असा एकुण १ लाख ५ हजार रुपयांची मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला.
सदरील कार्यवाही देगलूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारोती मुढे यांच्या उपस्थितीत पोलीस उपनिरीक्षक नरहरी ...
