Shakuntal School for Excellence ; शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्सची विद्यार्थिनी गायत्री स्वामी हिला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा पत्र
नांदेड l नांदेड जिल्ह्याचा अभिमान वाढवणारी बाब असून शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्समध्ये इयत्ता ९ वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी गायत्री वैजनाथ स्वामी हिला थेट देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी स्वतःचे हस्ताक्षर असलेले शुभेच्छा व आशीर्वाद पत्र पाठवले आहे.
गायत्रीने रक्षाबंधनाच्या निमित्ताने स्वतःच्या हाताने सुंदर राखी तयार करून पंतप्रधानांना पाठवली होती. त्यासोबतच तिने सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध लोकहिताच्या योजनांविषयी सविस्तर पत्र लिहून त्या योजनांमुळे सामान्य जनतेला मिळणारा लाभ मनापासून व्यक्त केला होता.
गायत्रीचे हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी स्वतः वाचले व तिच्या या निष्पाप भावनेला व देशहिताच्या जाणिवेला अभिनंदन व शुभेच्छा देत तिला पत्र पाठवले आहे. त्या पत्रामध्ये मोदीजींनी लिहिले आहे की, देशातील मुलींनी पुढाकार घेऊन यश संपादन केले पाहिजे, तसेच शासनाच्या योज...
