Nanded ; डंकीन दर्गा येथे नांदेडात ९ मे रोजी सैलानी बाबांचा संदल
नांदेड | हजरत हाजी अब्दुल रहेमान उर्फ सैलानी बाबांचा संदल येत्या दि.०९ मे (शुक्रवारी) सायंकाळी ५ वाजता गंगाचाळ डंकीन समोर असलेल्या दर्गा येथे होणार असल्याची माहिती येथील मुख्य पुजारी रघुबाबा यांनी दिली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील गंगाचाळ डंकीन भागात असलेल्या सैलानी बाबांच्या दर्गा येथुन संदल मिरवणूक काढण्यात येते.
यावर्षीही येत्या दि.०९ मे (शुक्रवारी) सायंकाळी ५ वाजता गोदावरीच्या घाटावरुन या संदल मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. ही मिरवणूक भीमघाट, देगावचाळ, पक्कीचाळ पोलीस चौकी ते गंगाचाळ पासून डंकीन समोरील सैलानी बाबांच्या दर्गा येथे पोहचेल.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती गणपत धबाले, पप्पु (प्रदीप) जाधव, विलास धबाले, विश्वनाथ घडलिंगे, शुभम ठाकूर, शशिकांत भुसेवाड, विश्वनाथ वाघमारे, रमेश गोडबोले, डॉ.अब्दुल बाकी, मुकुंद भोळे, राजू मोरे, बंटी लांडगे, ऍड.महेश हाळदे, ...
