Sunday, May 31

Tag: pigeon pea farmers

Farmers worry : मुळी कुज रोगाचा कहर; मांजरम–नायगावात तूर उत्पादक शेतकरी संकटात

Farmers worry : मुळी कुज रोगाचा कहर; मांजरम–नायगावात तूर उत्पादक शेतकरी संकटात

कृषी, नांदेड
नांदेड, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील मौजे मांजरम व परिसरात यंदा तूर हे मुख्य पीक मोठ्या प्रमाणावर घेण्यात आले होते. मात्र अतिवृष्टीमुळे तूर पिकाला मुळी कुज (रूट रॉट) रोगाने मोठ्या प्रमाणावर फटका दिला असून, हजारो हेक्टर क्षेत्रावरील तूर पीक पूर्णपणे धोक्यात आले आहे. पिके हातात येण्याआधीच वाळून जाणे, झाडे पडणे आणि उत्पादनात प्रचंड घट होणे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यात भर म्हणजे, नाफेडकडून अद्याप शासकीय हमीभावाने तूर खरेदी सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. २०२५ साली झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या हातात कोणतेही पीक आले नाही, अशा परिस्थितीत यंदाच्या तूर पिकावरच शेतकऱ्यांची मोठी अपेक्षा होती. मात्र निसर्गाच्या अवकृपेने तीही मोडीत निघाली आहे. सध्या प्रशासन व लोकप्रतिनिधी निवडणुकां...
error: Content is protected !!