Wednesday, May 13

Tag: Patients and friends enjoyed

रुग्ण मित्रांनी घेतला सहस्त्रकुंड येथे निसर्गसौंदर्याचा आनंद -NNL

रुग्ण मित्रांनी घेतला सहस्त्रकुंड येथे निसर्गसौंदर्याचा आनंद -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
किनवट, परमेश्वर पेशवे।किनवट, नांदेड, हिंगोली, परभणी येथील रुग्णमित्रांची सहस्रकुंड येथे सहकुटुंब सहल २५ ऑगस्ट रोजी झाली. लोकसेवा मंडळाच्या माध्यमातून रुग्णमित्र मागील दोन वर्षापासून जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णसेवा मराठवाडा व खानदेश येथे करत आहेत. यात जिल्हा शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना नाव नोंदणी कुठे करणे, कोणता ओपीडी नंबर कुठे, कोणती तपासणी कुठे होते, कोणते डॉक्टर कुठे भेटतात, कोणाला रक्ताची गरज आहे का, कोणाला ऑपरेशन साठी मदत करता येईल का, कोणाला भोजनाची व्यवस्था करता येईल का, अशा अनेक प्रकारचे मार्गदर्शन करण्यात येत असते. श्रावण महिन्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी तसेच आपापल्या अनुभवांचे आदानप्रदान करण्यासाठी चार जिल्ह्यातील रुग्णमित्र सहस्रकुंड येथे ६०च्या संख्येने सहकुटुंब एकत्र आले होते. याप्रसंगी डॉ. सुभाषजी जोशी ( बालरोग तज्ञ, बीड . देवगिरी प्रांत रुग्णमित...
error: Content is protected !!