मराठा आरक्षण जनजागृती रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा-किनवट तालुका सकल मराठा समाज -NNL
किनवट, परमेश्वर पेशवे। सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होऊन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची पूर्वतयारी म्हणून ८ जुलै रोजी नांदेड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने सहकुटुंब सामील व्हावे, असे आवाहन किनवट तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने केले आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण व सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, या मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीसाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनाकरीता जनजागृती करण्यासाठी ६ जुलै ते १३ जुलै दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली काढण्यात येणार आहे. ६ जुलै रोजी शनिवारी पहिली रॅली हिंगोली जिल्ह्यात होणार आहे. र...
