Partially subsidized teachers : किनवट येथे अंशतःअनुदानित शिक्षकांनी दिला सामूहिक आत्मदहन करण्याचा दिला इशारा
किनवट| नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांनी सहाय्यक जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून २५ मार्च रोजी सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, १४ ऑक्टोंबर२०२४ च्या शासन निर्णयातील पदांना पुरवणी अर्थसंकल्प २०२४, पुरवणी मागण्या २०२५ व अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये निधीची तरतूद न केल्याच्या राज्यांतील सर्व अंशतः अनुदानित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मनात प्रचंड रोष व्यक्त होत आहे. तत्कालीन महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळांनी दि.१० ऑक्टोंबर २०२४ च्या मंत्रिमंडळ बैठकीच्या मान्यतेने दि.१४ ऑक्टोंबर २०२४ चा शासन निर्णय काढला यासाठी सातत्याने राज्यात तसेच आझाद मैदान मुंबई येथे शिक्षक समन्वय संघाच्या वतीने महाएल्गार आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलनाची फलनिष्पत्ती म्हणून शासन निर्णयातील एकूण पात्र ५२ हजार पदांना शा...
