Sunday, June 28

Tag: Pandit Pradeepji Mishra

Pandit Pradeepji Mishra : ‘असंगाशी संग, तर जीवन होईल भंग’- पंडित प्रदीपजी मिश्रा -NNL

Pandit Pradeepji Mishra : ‘असंगाशी संग, तर जीवन होईल भंग’- पंडित प्रदीपजी मिश्रा -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| जीवनात संगत कुणाशी करायची, सोबती कोण आहे, कसा आहे याची जाणीव आपल्याला असली पाहिजे, असंगाशी संग करून आपले जीवन, आपले आयुष्य उध्वस्त होईल, अशी वर्तणूक करू नका, वाईटाची संगत सोडा, त्याचेही जीवन सुधारण्याचा प्रयत्न करा, तो ऐकत नसेल तर त्याचा त्याग करा, अन्यथा तुमचे जीवन अधोगतीच्या मार्गावर जाईल,असे आवाहन पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी शिवमहापुराण कथेच्या सातव्या आणि अखेरच्या दिवशी केले. लाखो भाविकांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी या कथावाचनाची अत्यंत भक्तीभावाने सांगता झाली. गुरुवारी शिवमहापुराण कथेच्या सातव्या दिवशी पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी शिवमहापुराण कथेचा महिमा, महात्म्य आणि शिवजींच्या साक्षात्काराची महती कथन केली.कलयुगात सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण करणारी कथा म्हणजे शिवमहापुराण कथा आहे. वाईटाची संगत वाईटच असते,ज्याप्रमाणे आपण अग्नीला स्पर्श केला, तिच्या जवळ गेलो तर आगीचा चटका बसतो...
Pandit Pradeepji Mishra : तुमचा द्वेष करणार्‍यांची संख्या वाढली, तर समजा तुमची वाटचाल प्रगतीपथावर आहे-पंडित प्रदीपजी मिश्रा -NNL

Pandit Pradeepji Mishra : तुमचा द्वेष करणार्‍यांची संख्या वाढली, तर समजा तुमची वाटचाल प्रगतीपथावर आहे-पंडित प्रदीपजी मिश्रा -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| जीवनात जेव्हा इतरांकडून तुमचा द्वेष, मत्सर, ईर्षा, निंदा होत असते, त्यावेळी तुमची वाटचाल प्रगतीपथावर, असे समजा. वेळोवेळी होणारा अपमान, अपशब्द म्हणजे एकप्रकारे विष आहे, देवाधी देव महादेवालाही ते चुकले नाही, शंकरानेही जेव्हा विष प्राशन केले, तेव्हाच ते निलकंठेश्वरधारी बनले. त्यामुळे अशा निंदा-द्वेष करणार्‍यांकडे दुर्लक्ष करा,तुमचे गुणगान करणार्‍यांपेक्षा तुमच्यावर जळफळाट करणार्‍यांची संख्या वाढते तेव्हा तुम्ही यशाकडे मार्गस्थ होत आहात, असेच समजा असे आवाहन पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी शिवमहापुराण कथेच्या सहाव्या दिवशीच्या कथावाचनात केले. उद्या गुरुवारी शिवमहापुराण कथेची समाप्ती असून सकाळी 8 ते 11 या या दरम्यान ही कथा होणार असल्याने भाविकांची संख्या प्रचंड वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आज प्रारंभीच पूज्य प्रदीपजी मिश्रा यांनी श्रावणकुमारच्या कथेचे वाचन केले. श्रावणबाळाच्या म...
Pandit Pradeepji Mishra : ‘जिथे अहंकाराची वृद्धी, तिथे ज्ञानाचा र्‍हास अटळ’- पंडित प्रदीपजी मिश्रा -NNL

Pandit Pradeepji Mishra : ‘जिथे अहंकाराची वृद्धी, तिथे ज्ञानाचा र्‍हास अटळ’- पंडित प्रदीपजी मिश्रा -NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| जीवनात मान आणि अभिमान या दोघांनाही दूर ठेवले पाहिजे, या दोन्ही गोष्टी जेव्हा वाढायला लागतात, तेव्हा अहंकाराची उत्पत्ती होते आणि अहंकार जेव्हा वाढतो, तेव्हा ज्ञानाचा, बुद्धीचा र्‍हास अटळ असतो, रावणाच्या जीवनातही तेच घडले,त्यापासून आपण धडा शिकला पाहिजे, शुद्ध पाण्यासारखेच शुद्ध मन आणि शुद्ध वाणी असायला हवी, असे प्रतिपादन पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी शिवमहापुराण कथा वाचनप्रसंगी केले. कथेच्या पाचव्या दिवशीही कथामंडपातील भाविकांची अलोट गर्दी कायमच होती. लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविकांना पंडितजींनी नमन केले. पंडितची म्हणाले,शिवमहापुराण कथेत शिवजींना भक्त-वत्सल अशी उपमा दिली आहे, याबाबतची कथा त्यांनी विस्ताराने सांगितली. गोमातेकडे शिवपार्वतीने केलेली पार्थना, दिलेले वचन आणि गोमातेने गिळंकृत केलेल्या शिवजींना आपल्या उदरातून बाहेर काढतानाचा प्रसंग श्रवण करताना भाविक मंत्रमुग्ध झाले होत...
error: Content is protected !!