Osmannagar ; उस्माननगर पोलिस स्टेशनच्या रणरागिणी सपोउनि सौ. लोपामुद्रा आनेराव या टांझानिया किलोमांजारो शिखरावर चढण्यासाठी रवाना
उस्माननगर, माणिक भिसे l उस्माननगर पोलिस स्टेशन च्या कर्तव्यदक्ष, जिद्दी , चाणाक्ष हुशार , मेहनती, व सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सौ.लोपामुद्रा दत्तराव आनेराव/ (सौ.लोपामुद्रा सुशील कुबडे) या द.आफ्रिका खंडातील सर्वात उंच असलेल्या टांझानिया देशातील किलोमांजारो या शिखरावर जाण्यासाठी रवाना झाल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील रोहिपिंपळगावातील एका गरीब शेतकऱ्यांच्या पोटी जन्म झाला.पहिली ते चौथी जि.प.शाळा वसंतवाडी ,पाचवी ते सातवी जि.प.शाळा रोहिपिंपळगाव,आठवी ते दहावी कै.यादवरावजी शाळा चिकाळा येथे शिक्षण झाले.
पुढील शिक्षण मुदखेड व नायगाव येथे केले.वडीलांना खेळाची आवड असल्याने स्वतः ला स्पर्धेत जाता आले नाही म्हणून, आपली चार एकर शेती पडीत ठेवून स्वतः त्यांची प्रॅक्टिस घेतली . मुला - मुलीत कुठलाही भेदभाव न करता त्यांनी आपल्या मुलीला मुलाच्या बरोबरीने शेतामध्ये सराव करून घेतला . अवघ्...
