शेगाव येथे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे आयोजन -NNL
शेगाव/भोकर| जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत अंनत श्री विभूषीत जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळयाचे आयोजन मंगळवार दिनांक 20 व बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी श्री गणेश प्रस्थ, मंगल कार्यालय, पुरुषोत्तम हरी पाटील नगर, एम एस ई बी चौक, खामगाव रोड, शेगांव जि. बुलढाणा येथे सकाळी 9 : 00 वाजता आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पश्चिम विदर्भ पीठ प्रमुख श्री कुंडलिकराव वायभासे साहेब , पीठ व्यवस्थापक श्री सुरेश मोरे साहेब यांनी एका प्रसिध्दी प्रत्रकाद्वारे दिली आहे.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने संस्थानाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात जसे की, ग्रामस्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रमांतर्गत इंग्रजी माध्यमांची मोफत शाळा, मोफत वेदपाठ शाळा, रक्तदा...
