Welfare Department ; इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत तालुकास्तरावर मेळाव्याचे आयोजन -NNL
किनवट| इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इमाव, विजाभज व विमाप्र या समाजासाठी अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या विभागामार्फत महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जाती विकास महामंडळ ही महामंडळे कार्यरत आहेत. या मंडळातर्गत उपकंपन्या तसेच महाज्योती, अमृत यासारख्या संस्थामार्फत देखील अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनाची माहिती लाभार्थ्यांपर्यत पोहचविण्यासाठी 15 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत जिल्ह्यात तालुकास्तरावर मेळावे आयोजित केले आहेत.
दिनांक 17 ऑगस्ट रोजी भोकर आश्रमशाळेत, 18 ऑगस्ट आश्रमशाळा पळसा, हदगाव , 19 ऑगस्ट आश्रमशाळा हिमायतनगर, 20 ऑगस्टला आश्रम शाळा दहेली तांडा, किनवट, 21 ऑगस्ट आश्रमशाळा कुटूंरतांडा नायगाव, 22 ऑगस्ट आश्रमशाळा दगडापूर बिलोली, 23 ऑगस्ट आश्रम शाळा भुतन हिप्परगा देगलूर, 24 ऑगस्टला आश्...
