Wednesday, May 13

Tag: Opportunities for youth and women to become entrepreneurs through

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून युवक युवतीना उद्योजक होण्याची संधी -NNL

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून युवक युवतीना उद्योजक होण्याची संधी -NNL

नांदेड
नांदेड| विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेवून उद्योजकतेला चालणा मिळावी यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना सन 2019 पासून राज्यात राबविली जात आहे. या योजनेची अंमलबजावणी जिल्हास्तरावर जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत करण्यात येते. तरी नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र व होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे. या योजनेतर्गत अर्जदारांना उत्पादन व्यवसाय (उदा. बेकरी, पशुखाद्यनिर्मिती, फॅब्रीकेशन ) व सेवा उद्योग (उदा. वैद्यकीय सेवा, ब्युटीपार्लर, सलून) साठी अर्ज करता येतील. ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येते. या योजनेचे https://maha-cmegp.gov.in संकेतस्थळ आहे. या योजनेच्या पात्रतेसाठी अ...
error: Content is protected !!