Online Application ; दहावी पुरवणी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सुरू
नांदेड। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीसाठी पुरवणी परीक्षा जून-जुलै 2025 मध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी केले आहे.
इयत्ता दहावीच्या फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेचा निकाल 13 मे रोजी ऑनलाईन जाहीर झाला असून या अनुषंगाने पुरवणी परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. या परीक्षेस पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेस प्रविष्ट न झालेले) व जून-जुलै 2025 परीक्षेसाठी नावनोंदणी केलेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थ्यांची अर्ज (औद्यागिक प्रशिक्षण...
