Sunday, June 28

Tag: One quintal of sweets in the seven days of Diwali “Brother’s Humanity Fridge”

Diwali ; दिवाळीच्या सात दिवसात एक क्विंटल मिठाई “भाऊचा माणुसकीचा फ्रिज”

Diwali ; दिवाळीच्या सात दिवसात एक क्विंटल मिठाई “भाऊचा माणुसकीचा फ्रिज”

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लोकसहभागातून दिवाळीच्या सात दिवसात एक क्विंटल मिठाई "भाऊचा माणुसकीचा फ्रिज", येथे उपेक्षितांना वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी दिली आहे. यावर्षी या उपक्रमामध्ये रुपेश वट्टमवार, डॉ. सुनिता गोधमगावकर, शिक्षणाधिकारी सविता बिरगे , मोहित व रेणुका सोनी, चंद्रकांत गंजेवार, शोभा नंदलवार, सुरेश पळशीकर, अविनाश चिंतावार मुंबई यांनी प्रत्येकी दहा किलो मिठाई उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय दोन दानशूर नागरिकांनी अज्ञात दाता म्हणून सहभाग घेतला आहे. १७ ते २३ ऑक्टोबर दरम्यान सकाळी दहा वाजता दररोज वेगवेगळी दहा किलो मिठाई "भाऊचा माणुसकीचा फ्रिज", पंचवटी हनुमान मंदिरा जवळ, महावीर चौक नांदेड येथे अन्नदात्यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे.यामध्ये बुंदी लाडू, करंजी, बेसन लाडू, काला जामुन, रवा लाडू, म्हैसूर पाक, बालुशाही याचा समावेश आहे...
error: Content is protected !!