Thursday, May 14

Tag: on railway trains and in the area

Fire Safety : रेल्वे गाड्या व परिसरात अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा

Fire Safety : रेल्वे गाड्या व परिसरात अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड | प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने रेल्वे गाड्या व रेल्वे परिसरात अग्निसुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन सर्व प्रवाशांना केले आहे. ज्वलनशील पदार्थ बाळगणे, आग-संबंधित कृती करणे तसेच धूम्रपान करणे हे पूर्णपणे प्रतिबंधित असून, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे. नांदेड विभागामार्फत सध्या रेल्वे गाड्या व स्थानकांमध्ये ज्वलनशील वस्तूंची वाहतूक, सिगारेट व बिडी ओढणे याविरोधात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम रेल्वे संरक्षण दल (RPF) व वाणिज्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या संयुक्त सहभागातून राबविली जात असून, प्रवाशांमध्ये जनजागृती करणे व असुरक्षित बाबींना आळा घालणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, गाड्या व स्थानकांमध्ये अगरबत्...
error: Content is protected !!