Nanded District Village Workers Police Patil Association ; नांदेड जिल्हा गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने राज्यध्यक्ष पंढरी पाटील सेठ व नवनियुक्त पोलीस पाटील यांच्या सत्कार – NNL
नवीन नांदेड l महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटना नांदेड जिल्हा यांच्या वतीने राज्यध्यक्ष पंढरीशेठ पाटील यांच्या व नांदेड जिल्ह्यातील व नांदेड तालुक्यातील नवनियुक्त पोलीस पाटील व नांदेड जिल्हा महिला आघाडीच्या पदाधिकारी नियुक्ती व सत्कार नवीन कौठा येथील सप्तगिरी बॅकेट हाॅल येथे आयोजन १९ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते.
यावेळी राज्यध्याक्ष पंढरीनाथ शेठ पाटील यांच्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आले होते, यावेळी राज्यपाल पुरस्कार प्राप्त राज्य उपाध्यक्ष खंडेराव बकाल, कोकण विभागाचे अध्यक्ष संजय पाटील, राज्य सहसचिव लक्ष्मण पाटील,पनवेल संघटना सचिव भरत पाटील,रायगड संघटना प्रमोद आगलावे,नांदेड जिल्हाध्यक्ष हेमंत पाटील , जेष्ठ पोलीस पाटील शिवाजी निळेकर, मराठवाडा विभाग अध्यक्ष मारोतराव कदम,नांदेड जिल्हा उपाध्यक्ष, मारोती पांचाळ जोमेगावकर,नांदेड जिल्हा महिला पोलीस पाटील सौ.सुमनबाई खोसडे या...
