Flag Hoisting by Collector Abhijit Raut : भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनाला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण -NNL
नांदेड| भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य शासकीय समारंभात जिल्हाधिकारी अभिजीत यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यसैनिक व विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत सकाळी 9.05 वाजता हर्षोल्हासात त्यांनी ध्वजवंदन केले. यावेळी जिल्हावासियांना त्यांनी शुभेच्छा दिल्या तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कार्यासाठी अनेकांना पुरस्कार बहाल केले. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज धुळे येथे ध्वजवंदन केले. तथापि, स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर नांदेड जिल्ह्यातील तमाम नागरिकांना त्यांनी शुभेच्छा संदेश दिला आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय मधील या सोहळ्याला आज ध्वजवंदन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याचे 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित या समारंभा...
