Fake government decision in Shinde-Fadnavis regime..! अहो आश्चर्यम्…..! शिंदे-फडणवीस शासनात चक्क बनावट शासन निर्णय -NNL
नांदेड, गोविंद मुंडकर| अहो आश्चर्यम्……..! शिंदे-फडणवीस शासनात चक्क बनावट शासन निर्णय काढल्याचे उघड झाले. याबाबत मंत्रालयातून गुन्हा नोंद करण्याचे पत्र एकात्मिक आदिवासी प्रकल्प किनवट यांना देण्यात आले असल्याची माहिती कार्यालयीन सुत्रांनी दिली. यात अनेक दिग्गज अधिकारी आणि संस्थाचालक गुंतले असल्यामुळे तब्बल चार महिने उलटूनही अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. याप्रकरणी एकात्मिक आदिवासी प्रकल्पाधिकारी कावलि मेघना यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभागाच्या कार्यालयातून सविस्तर माहिती उपलब्ध होईल असे सांगितले.
संस्थाचालक, मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी मिळून नांदेड जिल्ह्यातील मुक्रमाबाद येथे चक्क अनाधिकृत शाळा सुरू केली. ही शाळा सुरू करण्यासाठी चक्क शिंदे-फडणवीस शासनाचा ‘शासन निर्णय आदिवासी विकास विभागाचा’ दि. 14 मर्च 2024 चा बनावट शासन निर्णय काढण्...
