Saturday, June 27

Tag: of the palanquin of Khandoba

Malegaon pilgrimage : यळकोट यळकोट जय मल्हार… देवस्वारी व खंडोबाच्या पालखी पूजनाने माळेगाव यात्रेस सुरुवात

Malegaon pilgrimage : यळकोट यळकोट जय मल्हार… देवस्वारी व खंडोबाच्या पालखी पूजनाने माळेगाव यात्रेस सुरुवात

नांदेड, महाराष्ट्र
श्रीक्षेत्र माळेगाव | “उत्तम जागा पाहुनी मल्हारी देव नांदे गड जेजुरी…” अशा जयघोषात यळकोट यळकोट जय मल्हार म्हणत, बेलभंडाऱ्याची उधळण करत पारंपरिक पद्धतीने यंदाही श्रीक्षेत्र माळेगाव येथील श्रीखंडोबा रायाच्या यात्रेस भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली. देवस्वारी व पालखी पूजनाच्या सोहळ्यासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावून पालखीचे दर्शन घेतले. खंडोबाच्या व मानकऱ्यांच्या पालखीचे प्रतिवर्षाप्रमाणे शासकीय विश्रामगृहावर जिल्हा परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात आले. दुपारी पालखी पूजनानंतर देवस्वारी काढण्यात आली, यावेळी मानकऱ्यांचा विधीवत गौरव करण्यात आला. या सोहळ्यास सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्य मंत्री मेघना बोर्डीकर, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जि. प. माजी सभापती प्रविण पाटील चिखलीकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली, सामाजिक कार्यकर्त्या प्रणिताताई देवरे-चिखलीकर, ...
error: Content is protected !!