Lower Panganga Dam Anti-Sangrah Committee : निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीचे अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना निवेदन -NNL
श्रीक्षेञ माहूर| निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीने वंचित बहुजन आघाडीचे संस्थापकीय अध्यक्ष तथा माजी खासदार अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची अकोला येथे जाऊन भेट घेतली आणि निम्न पैनगंगा प्रकल्पा ऐवजी सिरीज ऑफ बॅरेज बांधून ९५ गावातील दीड लाख लोकांना विस्थापन होण्यापासून वाचवावे तसेच समृद्ध जंगल व सुपीक जमीनही या प्रकल्पात बुडणार असल्याने ते सुद्धा वाचवावे अशी विनंती एका निवेदनातून केली, तसेच निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या विरोधात धरण विरोधी संघर्ष समितीने पुणे व औरंगाबाद न्यायालयात दावा दाखल केलेला असून न्यायालयात तारीख पे तारीख मिळत आहे. निर्णय काही लागत नाही ही बाब ही धरण विरोधी समितीने अॅड. आंबेडकर यांच्या लक्षात आणून दिली.
अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आपण या प्रकरणी येत्या एक-दोन दिवसातच मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याशी बोलू तसेच या आंदोलनाला मानवीय दृष्टिकोनातून जे काही सहकार्य दे...
