Wednesday, May 13

Tag: of State-Level ‘Ideal Editor’ Award

Rupesh Padmukh : रुपेश पाडमुख यांना राज्यस्तरीय ‘आदर्श संपादक’ पुरस्कार जाहीर

Rupesh Padmukh : रुपेश पाडमुख यांना राज्यस्तरीय ‘आदर्श संपादक’ पुरस्कार जाहीर

नांदेड, करियर
नांदेड| वृत्तपत्र क्षेत्रात तब्बल पंचवीस वर्षांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे दै. समीक्षाचे संपादक रुपेश पाडमुख यांना पुणे येथील स्वप्नल फाऊंडेशनतर्फे राज्यस्तरीय ‘आदर्श संपादक’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा दिनांक २३ मार्च २०२६ रोजी पुणे महानगरपालिकेच्या गंज पेठ येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सांस्कृतिक केंद्रात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले रुपेश पाडमुख यांनी पत्रकारिते बरोबरच सामाजिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले आहे. मागील अनेक वर्षांपासून विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान, उपेक्षित महिलांचे प्रोत्साहन, तसेच वैद्यकीय, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा गौरव करण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. तसेच शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रती ...
error: Content is protected !!