Honoring the award winners : शिराढोण पत्रकार संघाच्या वतीने शिराढोण परिसरातील पुरस्कार विजेत्यांचा गौरव -NNL
उस्माननगर| शिराढोण ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने शिराढोण ता.कंधार येथील ज्येष्ठ नागरिक तथा सरपंच , ग्रामसेवक , शिक्षक इंजिनिअर यांच्या सह अनेक पदाधिकारी यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल यथोचित सत्कार सन्मान करून गौरविण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने पृथ्वी , वायू , जल , आग्नी , आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारीत ' माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये राज्यातील २२२१८ ग्रामपंचायतींनी भाग घेतला होता.यात छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये शिराढोण ता.कंधार जि.नांदेड येथील ग्रामपंचायत ने प्रथम क्रमांक पटकावला असून महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिराढोण ग्रामपंचायतीला प्रथम पारितोषिक म्हणून ५० लक्ष रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे.
शिराढोण ग्रामपंचायतीने मिळवलेल्या या दैदीप्यमान यशाबद्दल शिराढोण चे सरपंच प्रा.खुशाल पाटील पांडागळे , ग्रामविकास अधिकारी मुंजाळ साहेब , उपसरपंच पांडुरंग पवार ...
