Sunday, May 17

Tag: of Shankarpata

Malegaon crowd stamped the popularity of Shankarpata : शंकरपटाच्या लोकप्रियतेवर माळेगावच्या गर्दीचे शिक्कामोर्तब -NNL

Malegaon crowd stamped the popularity of Shankarpata : शंकरपटाच्या लोकप्रियतेवर माळेगावच्या गर्दीचे शिक्कामोर्तब -NNL

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
नांदेड| लाईन क्लिअर...जोडी सोडा... जोडी मालकासाठी खुशखबर... तीन सेकंद 38 पाँईट... आणि वायुगतीने ...  विक्रमी वेळेत अंतर पार... पाठोपाठ शेतकऱ्यांच्या टाळ्या शिट्ट्या... अशा माळेगावच्या माळरानावरील धावत्या समालोचनात ५८ बैल जोड्यांनी डोळ्यांचे पारणे फेडणारा थरार रचला. शंकर पटाच्या गर्दीने हा खेळ तुफान लोकप्रिय असल्याचे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. शेती,मातीत रमणाऱ्या शेतकऱ्यांचा माळेगावचा शंकरपट म्हणजे जीव की प्राण. न्यायालयाच्या निर्णयानंतर गेल्या वर्षीपासून पुन्हा बैलगाड्यांच्या शर्यतीला सुरुवात झाली आहे. बंदी उठल्यावरचा आजचा माळेगावचा दुसरा शंकरपट. आज गर्दीचे सर्व उच्चांक मोडत माळेगावात मराठवाडा, विदर्भातील तसेच बाजूच्या राज्यातील शेतकऱ्यांनी या शंकरपाटासाठी गर्दी केली होती. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून यासाठी बैलजोडी आल्या होत्या. त्यामुळे यंदाचा शंकरपठ अतिशय चुरशीचा गर्दीचा आणि ...
error: Content is protected !!