Thursday, May 14

Tag: of Saint Tukaram Maharaj

Saint Tukaram Maharaj : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन

Saint Tukaram Maharaj : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन

धार्मिक, पुणे
पुणे| मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र देहू येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते मंदिरात श्री गणेश पूजन, कलश पूजन,पाद्य पूजन करून पालखीची विधिवत प्रस्थान पूजा व आरती झाली. टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात तल्लीन वारकरी.... 'ग्यानबा तुकाराम', 'माऊली, माऊली' चा गजर.... डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी...अशा भक्तिमय वातावरणात देहू येथून आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. पंढरीच्या वारीसाठी मोठ्या संख्येने वारकरी देहू नगरीत दाखल झाले होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार श्रीमती सुनेत्राताई पवार, खासदार श्रीरंग बारण...
error: Content is protected !!