Chief Executive Officer Meghna Kavali : शिस्त व वेळेचे व्यवस्थापन ही नारायण मिसाळ यांच्या कार्यशैलीची खरी ओळख – मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली
नांदेड| जलजीवन मिशन व स्वच्छता अभियानांतर्गत नारायण मिसाळ यांनी कोणतेही काम माझे नाही असे न म्हणता, प्रत्येक काम कार्यक्षमतेने पार पाडले. शिस्त, वेळेचे व्यवस्थापन व तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर ही त्यांच्या कार्यशैलीची खरी ओळख आहे, असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी काढले.
जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या नारायण मिसाळ यांची बदली परभणी जिल्हयातील पुर्णा पंचायत समिती येथे गट विकास अधिकारी म्हणून झाली. यानिमित्त आज जिल्हा परिषद नांदेडच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीईओ मेघना कावली होत्या. कार्यक्रमास जलजीवन मिशनचे प्रभारी प्रकल्प संचालक अमित राठोड, ग्रामीण पाणी पुरवठा विभागा...
