Youth Festival : ‘ज्ञानतीर्थ-२०२४’ युवक महोत्सवाच्या शोभा यात्रेतून मराठवाड्याच्या कला आणि संस्कृतीचे दर्शन -NNL
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सहयोग सेवाभावी संस्था कॉलेज ऑफ एज्युकेशन विष्णुपुरी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्ञानतीर्थ-२०२४’ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या दि. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी शोभा यात्रेस प्रारंभ झाला. या शोभा यात्रेत विविध महाविद्यालयातून सहभागी स्पर्धक कलावंतानी सहभाग घेतला. या शोभा यात्रेत नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर जिल्ह्यातील महाविद्यालयाने सहभाग नोंदविला. शोभायात्रेमध्ये मराठवाड्याची लोककला, लोकसंस्कृती, दिंडी, ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथक या बरोबरच मतदान जनजागृती करीत ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ असा संदेश शोभा यात्रेतून दिला.
शोभा यात्रेची सुरुवात विष्णूपुरी गावातील मारुती मंदिरापासून करण्यात आली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. यावेळी ...
