Sunday, May 17

Tag: of government schemes

Multimedia Exhibition : शासकीय योजना तळागाळात पोहचविण्यासाठी केंद्र शासनाच्या मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे मोलाचे योगदान….तहसीलदार हरीश गाडे

Multimedia Exhibition : शासकीय योजना तळागाळात पोहचविण्यासाठी केंद्र शासनाच्या मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे मोलाचे योगदान….तहसीलदार हरीश गाडे

हिंगोली, मनोरंजन
हिंगोली | येथील औंढा नागनाथ मंदिर परिसरातील भक्त निवास क्र. 2 येथे आयोजित प्रदर्शनात शासकीय योजना तळागाळात पोहचविण्यासाठी केंद्र शासनाच्या मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे मोलाचे योगदान ठरत आहे असे औंढा येथील तहसीलदार हरीश गाडे यांनी प्रतिपादन केले. केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरोच्यावतीने आयोजित केंद्र सरकारची 11 वर्षे-सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची, हर घर तिरंगा, आजादी का अमृत महोत्सव या संकल्पनेवर आधारित मल्टी मीडियाच्या चित्रप्रदर्शनच्या उद्घाटन करण्यात आले. पुढे बोलताना तहसीलदार गाडे म्हणाले की मागील 11 वर्षात शासनाने जनसामान्यांच्या विविध योजना राबविल्या आणि त्याचा उपयोग समाजातील विविध घटनांना मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचं जीवनमान उंचावत असून जनतेनेही यामध्ये सहभागी व्हाव. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी ,औंढा नागनाथ संस्‍थानचे प्...
Girish Mahajan : शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीवर विकासाचे आलेख उंचावतात : गिरीश महाजन -NNL

Girish Mahajan : शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीवर विकासाचे आलेख उंचावतात : गिरीश महाजन -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना विकासासाठी आपल्या पुढ्यात उभ्या आहेत. ज्या लोकप्रतिनिधीमध्ये लोकभावना व ज्यांच्याकडे लोकजागृती आहे. लोकांबद्दल कणव आहे. त्यांच्या मतदार संघामध्ये विकास धावत असतो. शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीवरच विकासाचे आलेख उंचावतात, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केले. नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे जिल्हास्तरीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या सोबत भोकर मतदार संघामध्ये एकाच दिवशी 926.71 कोटी रुपयांच्या विकास कामाच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्या दरम्यान बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये पाठपुराव्याला प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळे भोकर सारख...
error: Content is protected !!