Collector : शासकीय जमिनीवर बेकायदेशीर ताबा दाखवाल तर गंभीर कारवाई करू : जिल्हाधिकारी -NNL
नांदेड| नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये शासकीय अर्थात सरकारी जमिनीची बनावट खरेदी विक्री करून गैरव्यवहार केल्याचे काही ठिकाणी पुढे येत आहे.अशा प्रकारे गैरव्यवहार सहन केले जाणार नाही. नांदेड जिल्ह्यात अशा शासकीय जमिनीची यादी सर्व संबंधित कार्यालयात दर्शनी भागात प्रसिद्ध करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
नांदेड जिल्ह्यामध्ये तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये सातबारा अधिकार अभिलेखात महाराष्ट्र शासनाच्या नावे नोंद असलेल्या शासकीय जमिनी, गायरान जमिनीची बेकायदेशीर खरेदी विक्री होत असल्याचे पुढे आले आहे. खोटे कागदपत्र तयार करून ग्रामपंचायतच्या नमुना नंबर आठ अ ला बेकायदेशीर नोंद होत असल्याच्याही काही तक्रारी आहेत. तालुका व जिल्हा कार्यालयात अशा तक्रारी येत असल्याने त्याची गंभीर नोंद जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली आहे.
काही प्रकरणात तपास करण्याचे आदेशही देण्य...
