Baswantrao Mundkar : स्वातंत्र्य चळवळीतले “बाप” माणूस- बसवंतराव मुंडकर -NNL
स्वतःसाठीच तर सगळे जगतात पण दुसऱ्यासाठी ही जगता आलं पाहिजे...
आपलंही आयुष्य देश सेवेसाठी परमेश्वराकडे मागता आलं पाहिजे...
आपलं जीवन हे आपल्यासाठी नसून आपल्या देशासाठी आहे आणि या देहाचा वापर सत्कार्यासाठी लागावे या उदात्त हेतूने प्रेरित होऊन गोवा मुक्ती संग्रामात धाडसाने झोकून देऊन गोवा मुक्तीसाठी झटलेले स्वर्गीय बसवंतराव मुंडकर यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागते. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत असताना त्यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील अनेक उपेक्षित स्वातंत्र्यसैनिकांचं स्मरण व्हावे हा या लेखणाचा शुद्ध हेतू.....
भारत स्वतंत्र झाला मात्र गोवा हा पोर्तुगीज यांच्या ताब्यात होता. तेथील हिंदू वरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढत असताना अनेक ठिकाणी हत्याकांड,जबरदस्ती धर्मांतर या बाबीमुळे अनेकांच्या मनात असंतोष निर्माण केलेले होते . समता, बंधुता आणि न्याय भूमिका अंगी कारणारे तसेच सर्वांसाठी स्वात...
