Poor Work : धानोडा–हिमायतनगर महामार्गाच्या कामातील निकृष्ट कारभारावर संतापाची लाट
हिमायतनगर, अनिल मादसवार| धानोडा ते हिमायतनगर या राष्ट्रीय महामार्गाचे काम ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचं केल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्याने प्रवास धोकादायक बनला आहे. हिमायतनगर शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या दुतर्फा नाल्यांची कामे ठेकेदाराने मागील तीन वर्षांपासून प्रलंबित ठेवली होती. यामुळे अतिवृष्टीच्या काळात वार्ड क्रमांक 4 व 16 मधील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठे आर्थिक नुकसान झाले.
नुकतेच वाढत्या लोकक्षोभानंतर ठेकेदाराला नालीकाम सुरू करावे लागले असले तरी या कामातही पुन्हा निकृष्ट दर्जाचा वापर होत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. नेहरूनगर, मूर्तजानगर आणि शहरातील जागरूक नागरिकांनी कामाची पाहणी केली असता त्यांना ठेकेदाराचा गलथानपणा स्पष्टपणे जाणवला. त्यांनी संबंधित अभियंत्याला जाब विचारला; मात्र अभियंत्याने नागरिकांच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष...
