Saint Janabai is the epitome of Dasyabhava : दास्यभावाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे संत जनाबाई -NNL
परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये त्यांचा जन्म झाला. पुढे त्या पंढरपुरात संत नामदेवांचे वडील दामाशेट शिंपी यांच्याकडे आल्या. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबियांतील एक घटक बनल्या. त्या स्वत:ला ‘नामयाची दासी’ म्हणवून घेत असत. विठ्ठलचरणी सर्व जीवन समर्पित केलेल्या जनाबाई यांनी देहभान विसरून दिवसरात्र एक करून संत नामदेवांच्या घरी सेवा केली. त्यांच्यासाठी प्रत्येक कर्मच ब्रह्मरूप झाले होते. त्या विठ्ठलभक्तीत एवढ्या रंगून जाऊन सेवा करत की, विठ्ठल प्रत्यक्ष येऊन त्यांना सेवेत साहाय्य करत असे.
एकदा जनाबाईचे आणि तिच्या शेजारच्या बाईचे शेणाच्या गोवर्यांवरून कडाक्याचे भांडण झाले; कारण दोघींनी जवळजवळच गोवर्या उन्हात सुकण्यासाठी घातल्या होत्या. त्यांचा हा वाद मिटवण्यासाठी त्याच गावातील पंच तेथे आले. त्यांनी ‘तुमच्या गोवर्या कशा ओळखायच्या ?’, असे त्या दोघींना विचारले. तेव्हा जनाबाईने सांगि...
