Chhatrapati Shivaji Maharaj : “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान” प्रभावी राबविण्याबाबत मार्गदर्शन
नांदेड| ग्रामीण भागातील नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित प्रश्नांचे तात्काळ निराकरण करून प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागामार्फत ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या दैनंदिन महसूल विषयक प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
या अनुषंगाने आज (दि. ५ मार्च २०२६) नांदेड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी (बीडीओ) तसेच ग्रामपंचायतींचे सरपंच यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वार...
