Veli Ki Gathi : वेलींच्या गाठी’ने उलगडले बदलत्या नात्यांचे गुंतागुंतीचे प्रश्न -NNL
नांदेड| ६३ व्या महाराष्ट्र राज्य मराठी नाट्य महोत्सवांतर्गत ‘वेलींच्या गाठी’ हे मेधा मराठे लिखित आणि गोविंद जोशी दिग्दर्शित नाटक बदलत्या नातेसंबंधांचे, प्रेमाचे, विवाह संस्थेचे आणि कुटुंब व्यवस्थेचे सूक्ष्म दर्शन घडवते. शुक्रवारी (ता.७) कुसुम सभागृहात या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले.
नाटकाची कथा सई आणि सलमा या दोन विवाहित महिलांच्या जीवनाभोवती फिरते. सई (रुपाली वडजकर) ही आय.टी. अभियंता असून, सलमा (राजेश्वरी जोशी) प्राध्यापक आहे. कौटुंबिक जीवनातील अस्वस्थता आणि अपेक्षांची पूर्तता न होण्यामुळे त्यांचे आयुष्य गुंतागुंतीच्या परिस्थितीत अडकते. त्यांचे पती अजय (राहुल वाळवेकर) आणि अख्तर (डॉ. शिवानंद बासरे), बाबा (डॉ. राजेंद्र गोणारकर), अब्बा (गोविंद जोशी), मित्र नवीन (विवेक भोगले) या पात्रांच्या माध्यमातून नात्यांमधील प्रेम, संशय, आणि ओढ यांचा प्रवास उलगडला जातो.
नाटकात दाखवले गेलेले संवाद...
