Sutkachaya Savlit Sattechi Bhook : सूतकाच्या सावलीत सत्तेची भूक: सुनेत्रा ताईंनी जबाबदारी निवडली की भाजपाची वंगाळ रणनीती
महाराष्ट्राच्या राजकारणात दुःखद आणि अनपेक्षित घडामोडी घडताना दिसत आहेत. २८ जानेवारी २०२६ रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेसह इतर पाच जणांचा बारामतीजवळील विमान अपघातात मृत्यू झाला. अवघ्या तीन दिवसांत ३१ जानेवारीला त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सूतकाच्या काळात सत्ता स्वीकारणे हे धैर्य आहे की राजकीय संधीचा फायदा?
अजित पवारांच्या अकाली निधनाने एनसीपी (अजित पवार गट) मध्ये पोकळी निर्माण झाली. महायुती सरकारमध्ये पक्षाचा वाटा व सत्ता टिकवण्यासाठी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांनी सुनेत्रा ताईंना पुढे केले. शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुभेच्छा दिल्या. "अजितदादांच्या सप्नांना साकार कराल." हे सका...
