Successful bariatric surgery : ५४ वर्षीय महीलेच्या अतिलठ्ठपणावर यशस्वी बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया व उपचार – NNL
नांदेड| यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे नांदेड येथील सौ.कल्पना कुंटूरकर नावाच्या ५४ वर्षीय महिला रुग्णावर यशस्वीपणे बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करत रुग्ण महीलेस अतिलठ्ठपणामुळे होणाऱ्या त्रासातून मुक्तता केली आहे यशोदा हॉस्पिटल, सिकंदराबाद येथील सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे प्रमुख व वरिष्ठ सल्लागार सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. प्रसाद बाबू आणि डॉ. अमर चंद जे वरिष्ठ सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट व बॅरियाट्रिक सर्जन यांच्या मार्गदर्शनात अतिलठ्ठपणावर यशस्वी बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करून रुग्णाचे वजन १२० किलावरून ७५ किलो ईतके कमी करत त्यांना होणाऱ्या दैनंदिन त्रासातून मुक्त केले आहे
याविषयी सविस्तर माहीती अशी की नांदेड येथील जनरल सर्जन राजेश कोमावाड यांनी प्राथमिक तपासणीनंतर त्यांना पुढील उपचारांसाठी यशोदा हॉस्पिटल, सिकंदराबाद येथील सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. प्र...
