Friday, June 26

Tag: of 17 lakhs from Ayurvedic plants

Farmer Success Story : डोंगरगावचा शेतकरी ठरला ‘ग्रीन डॉक्टर’; आयुर्वेदिक वनस्पतीतून १७ लाखांचा नफा

Farmer Success Story : डोंगरगावचा शेतकरी ठरला ‘ग्रीन डॉक्टर’; आयुर्वेदिक वनस्पतीतून १७ लाखांचा नफा

नांदेड, कृषी, व्हिडीओ
नांदेड | पारंपरिक शेतीतील तोट्याच्या चक्राला छेद देत मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने शेतीला नवी दिशा दिली आहे. रासायनिक खतांवर अवलंबून असलेल्या पारंपारिक पिकांना बाजूला सारत आयुर्वेदिक औषध वनस्पतींची लागवड करून या शेतकऱ्याने लाखोंचे उत्पन्न मिळवून दाखवले आहे. या यशस्वी प्रयोगामागे आहेत बालाजी महादवाड. त्यांनी आपल्या ११ एकर शेतीत चिया, अश्वगंधा, अजवाइन, कलुंजी, इटालियन तुळस यांसारख्या मागणी असलेल्या आयुर्वेदिक औषध वनस्पतींची लागवड केली. मागील तीन वर्षांपासून त्यांनी सातत्याने हा प्रयोग राबवला असून तो पूर्णतः यशस्वी ठरला आहे. महादवाड यांनी १० एकर क्षेत्रात सुमारे ४ लाख रुपये खर्च केला. मात्र योग्य नियोजन, बाजारपेठेची निवड आणि औषधी वनस्पतींच्या वाढत्या मागणीचा फायदा घेत खर्च वजा जाता तब्बल १७ लाख रुपयांचा नफा त्यांनी मिळवला आहे. विशेष म्हणजे, या पिकांना तुलनेने कम...
error: Content is protected !!