‘National Empowerment Award : राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तिकरण पुरस्कार-2025’ प्रदान
नवी दिल्ली| महाराष्ट्रातील दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी कार्यरत संस्थां आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे दिव्यांग व्यक्ती यांना आज राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तिकरण पुरस्कार-2025’ प्रदान करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनाचे औचित्य साधून नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित या सोहळ्यास केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार आणि दिव्यांगजन सशक्तिकरण विभागाच्या सचिव श्रीमती बी. विद्यावती यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय सन्मानाने महाराष्ट्रातील कर्तृत्वाचा गौरव
महाराष्ट्रातील अनेक व्यक्ती आणि संस्थांनी विविध श्रेणींमध्ये राष्ट्रीय स्तरावर हा सन्मान प्राप्त केला आहे. नागपूरच्या सुश्री अबोली विजय जितना यांना सर्वोत्कृष्ट दिव्यांगजन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती जितना या नागपूरच्या पहिल...
