Gurukul Public School, Nanded | नांदेडच्या गुरुकुल पब्लिक स्कुल मध्ये संस्कार भारती नांदेडचा आगळा वेगळा गुरुपौर्णिमा साजरी – NNL
नांदेड | भारतीय संस्कृती मध्ये व्यासपौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा पर्वास अनन्यसाधारण असे महत्व आहे. आपल्यावर संस्कार करणाऱ्या गुरुप्रति आदरभावना व्यक्त करण्याचा दिवस असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना याचे महत्व कळावे; यासाठी संस्कार भारती नांदेड; दरवर्षी एका शाळेमध्ये पारंपरिक गुरु पूजन सोहळ्याचे आयोजन करते. या वर्षी दि.२२ जुलै २०२४ रोजी नांदेड संस्कार भारतीच्या वतीने गुरुकुल पब्लिक स्कूल मध्ये पारंपरिक गुरू पूजन सोहळा संपन्न झाला.
आरंभी व्यासपीठावर प्रमुख अतिथी सौ.चारुताताई देशपांडे यांचे समवेत संस्कार भारती नांदेडच्या अध्यक्षा राधिका वाळवेकर, मार्गदर्शक तथा संरक्षक सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. दीपक कासराळीकर, कार्याध्यक्ष डॉ. प्रमोद देशपांडे आणि गुरुकुलच्या मुख्याध्यापिका सौ.वैशाली देशमुख आणि सौ.पल्लवी जोशी या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, नटराज पूजन, व्यास पूजन व सरस्वती पूजनाने कार्यक्...
