State Drama Competition Announced : राज्य नाट्य स्पर्धेच्या नांदेड केंद्राचा अंतिम निकाल जाहीर -NNL
नांदेड| ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नांदेड केंद्रातून तन्मय ग्रुपच्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. परभणीच्या राजीव गांधी युवा फोरमच्या ‘गंमत असते नात्याची’ या नाटकास द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी या निकालांची घोषणा केली. नांदेड येथील कुसुम सभागृहात ता.२५ नोव्हेंबर ते ता.६ डिसेंबर दरम्यान आयोजित प्राथमिक फेरीत एकूण १२ नाटके सादर करण्यात आली. तृतीय क्रमांकासाठी स्वप्नरंग सांस्कृतिक संस्थेच्या ‘व्हाईट पेपर’ या नाटकाची निवड झाली आहे. परीक्षक म्हणून देवदत्त पाठक, नंदकुमार सावंत आणि डॉ. माणिक वड्याळकर यांनी काम पाहिले.उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्यपदक नागेश लोकडे (वसुधैव कुटुंबकम्) आणि क्रांती दैठणकर (सेल्फी) यांना मिळाले. तसेच विविध नाटकांतील कलाकारांना गुणवत्ता प्रमाणपत्रांनी गौरवण्यात आले.
...
