Minister of State Meghna Bordikar : स्वच्छता तेथे आरोग्याची धनसंपदा : राज्यमंत्री मेघना बोर्डीकर
नांदेड| स्वच्छतेतून आरोग्य, आरोग्यातून समृध्दी असा संदेश संत गाडगेबाबा यांनी दिला आहे. जिथे स्वच्छता असते तिथे सुख-शांती असते. ज्या घरात स्वच्छता असते तेथे आरोग्याची धनसंपदा असते. म्हणून स्वच्छतेला महत्त्व असून ते प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचविणे गरजेचे असल्याचे मत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.
आज राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर ह्या माहूर येथे दर्शनाच्या व आनंद दत्तधाम आश्रमभेटीच्या निमित्ताने नियोजित दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी प्रथम माहूर गडावरील भगवान दत्त प्रभू, माता रेणुकेचे दर्शन घेऊन आरती केली. त्यानंतर साईनाथ महाराज वसमतकर यांच्या आनंद दत्तधाम आश्रमास भेट देऊन आशीर्वाद घेतले. यावेळी आश्रमाच्यावतीने त्यांचा यथोचित सत्कार सन्म...


