MGM ; एमजीएमच्या विद्यार्थ्याची यशाला गवसणी..! – NNL
नांदेड l एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेड चा विद्यार्थी ओमकार सोळंके बिटेक स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन नुकताच मिलिटरी ऑफिसर केडरची ट्रेनिंग डेहराडून येथून पूर्ण करून भारतीय सैन्यदलात दाखल आहे.
त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट. आई- वडील अल्पभूधारक शेतकरी. बारावी नंतर त्याने स्थापत्य अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेड येथून प्राविण्यासह पूर्ण केले. मनात देशसेवेचे वेड होतेच.
तो नांदेड- भोकर रोडवरील खेरगाव या त्याच्या गावाहून दररोज एसटी ने ये जा करत असे.तो महाविद्यालयात निर्धारित वेळेच्या लवकर यायचा कारण बस लवकर येत असे,ग्रंथालयातही तो दिवस दिवस अभ्यास करत असे. वर्गातही हुशार विद्यार्थ्यांत त्याची गणती होत असे.
एमजीएम मध्ये शिक्षण घेत असतानाच त्याच्या आईचे दुखत निधन झाले,अनेक दिवस आई दवाखान्यात दाखल होती,या परि...
