Sunday, May 17

Tag: medical stores

Strict Action ; नशेच्या औषधी विक्री करणाऱ्या मेडिकल स्टोअर्स विरुद्ध कडक कारवाई

Strict Action ; नशेच्या औषधी विक्री करणाऱ्या मेडिकल स्टोअर्स विरुद्ध कडक कारवाई

क्राईम, नांदेड
नांदेड। शहरातील विविध भागातील औषधी दुकानांच्या तपासणी करून अशा औषधांची, गोळयांची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश नुकतेच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले होते. नांदेड शहरात दाखल झालेल्या पथकाने 25 व 26 जून रोजी शहरातील विविध भागातील मेडिकल स्टोअर्सची तपासणी केली आहे. नशेच्या औषधी, गोळयांची विक्री करणाऱ्या मेडिकल स्टोअर्सविरूद्ध कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती नांदेड येथील सहायक आयुक्त (औषधे) अ. तु. राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. या कार्यवाहीत एकूण 13 मेडिकल स्टोअर्सची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2 दुकानामध्ये नशेच्या औषधांची, गोळयाची विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले. इतर 9 मेडिकल स्टोअर्सकडे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व त्याखालील नियम 1945 मधील नियम 65 नुसार त्रुटी आढळून आलेल्या आहेत. उर्वरित 2 मेडिकल स्टोअर्सकडे त...
error: Content is protected !!