Collector Abhijit Raut : निवडणुका पारदर्शीतेत पार पाडण्यात माध्यमांचे सहकार्य : जिल्हाधिकारी -NNL
नांदेड| निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर माध्यमांनी सहकार्य केले, त्यामुळे निवडणुकीचे कार्य अधिक पारदर्शितेत पार पाडणे शक्य झाल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीनंतर पत्रकारांसोबत शासकीय विश्रामगृहात रविवारी अनौपचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत बोलत होते. व्यासपीठावर यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, विभागीय अधीस्वीकृती समितीचे अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार विजय जोशी, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी,ज्येष्ठ पत्रकार शंतनू डोईफोडे,म.अब्दूल सत्तार आरेफ,केशव घोणसे पाटील, प्रिंट इलेक्ट्रॉनिक्स व समाज माध्यमांच्या प्रतिनिधीची उपस्थिती होती.
यावेळी माध्यमांशी अनौपचारिक गप्पा करताना त्यांनी गेल्या वर्षभरापासून यंत्रणा निवडणुकीच्या संदर्भातील कामांमध्ये व्यस्त असल...
