Shekh Afroz Demand ; मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी मार्टी संस्थांची अंमलबजावणी व्हावी – युवासेना अल्पसंख्याक तालुका प्रमुख शेख अफरोज
हिमायतनगर, अनिल मादसवार। महाराष्ट्र शासनाने दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी अल्पसंख्यांक संशोधन प्रशिक्षण संस्था "मार्टी" स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. हि संस्था राज्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व व्यावसायिक सशक्तीकरणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र संस्थेकडून कार्यक्षम होण्यासाठी दिरंगाई चालविली जात आहे. ही बाब लक्षात घेता मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी मार्टी संस्थांची अंमलबजावणी तात्काळ व्हावी अशी मागणी युवासेना अल्पसंख्याक तालुका प्रमुख शेख अफरोज यांनी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
या संस्थेसाठी शासनाने १६ पदे मंजूर केली असून, ६.२५ कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला, मात्र ही संस्था अद्याप कार्यक्षम झाली नाही. कार्यालय नाही....अधिकारी व कर्मचारी नियुक्त झाले नाही....परिणामी योजनांची अंमलबजावणी केली गेली नसल्याने. अल्पसंख्याक...
