Market of unauthorized hoardings everywhere in Nanded city? : नांदेड शहरात जिकडे तिकडे अनधिकृत होर्डींग्जचा बाजार ? -NNL
नांदेड| शहरात दोन्ही रस्त्याच्या मध्यभागात असलेल्या लाईटच्या पोलवर मर्यादित जागेच्या लहान आकाराच्या फ्लेक्सची परवानगी असतेवेळी संबधित अॅडव्हरटायर्झसच्या वतीने मोठ-मोठ्या आकाराचे फ्लेक्स लटकावून नियमांचे वारंवार उल्लंघन केले जात असून या प्रकारामुळे रस्त्यावरील रहदारीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच विचित्र अपघातांना निमंत्रण देण्याचा प्रकार असल्याचे चित्र दिसून येते आहे ..
शहरातील मुख्य भागांमध्ये अनधिकृत उभारलेल्या मोठमोठ्या फलकांचा बाजार दिसून येत आहे. महापालिकेची परवानगी न घेता हे फलक लावण्यात आल्याने व त्यांच्यावर इतक्या वर्षात ठोस कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या अनधिकृत फलकांनी शहरातील मुख्य बाजारपेठाही भरल्या आहेत. शहरातील गर्दीची ठिकाण ही महत्वाची व जाहिरातीसाठी फायद्याची समजली जातात. त्यामुळे या भागांमध्ये कायमच जाहिरात फलकांची गर्दी दिसून येते. सध्यतर याती...
