Thursday, June 25

Tag: Maratha community meets in Nanded

Maratha community meets : नांदेडमध्ये मराठा समाजाची बैठक पार – कुणबी जात प्रमाणपत्रासाठी हेल्प डेस्कची मागणी

Maratha community meets : नांदेडमध्ये मराठा समाजाची बैठक पार – कुणबी जात प्रमाणपत्रासाठी हेल्प डेस्कची मागणी

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक हॉलमध्ये काल मराठा समाजाची महत्वाची बैठक पार पडली. नव्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने झालेल्या या बैठकीत समाज बांधवांच्या वतीने अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत आत्महत्या केलेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी, सामाजिक आंदोलनातून दाखल गुन्हे मागे घेणे, आतापर्यंत किती गुन्हे मागे घेण्यात आले आणि किती प्रलंबित आहेत यावर चर्चा झाली. विशेष म्हणजे, 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक नियमावली व प्रक्रिया स्पष्ट नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्प डेस्क सुरू करण्याची मागणी समाज बांधवांनी केली. समाज बांधवांचे म्हणणे आहे की, नांदेड जिल्ह्यात कुणबी नोंदीचे दस्तऐवज अत्यल्प प्र...
error: Content is protected !!