Thursday, May 14

Tag: many village servant

village servants : हिमायतनगर तालुक्यात अनेक ग्रामसेवकांची ग्रामपंचायतीला दांडी ; ग्रामीण विकासांची कामे खोळंबली

village servants : हिमायतनगर तालुक्यात अनेक ग्रामसेवकांची ग्रामपंचायतीला दांडी ; ग्रामीण विकासांची कामे खोळंबली

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर| तालूक्यात कर्तव्यावर असलेले अनेक ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीला वेळेवर हजर राहत नसल्याने ग्राम विकासांची कामे खोळंबली आहेत. पंचायत समितीच्या कार्यालयात देखील अधिकारी व कर्मचारी ही वारंवार अनूपस्थित राहत असल्याने जनतेची कामे वेळेवर होणे कठीण झाले आहे. आता वरिष्ठ अधिकारीच कार्यालयाला दांडी मारत असल्याने त्यांचाच कित्ता इतर कर्मचारी गिरवीत आहेत. याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे बनले आहे. हिमायतनगर तालुक्यात ५३ ग्रामपंचायती आहेत. ग्रामसेवकांची संख्या तशी खुप कमी असल्याने एका ग्रामसेवकाला तीन ते दोन ग्रामपंचायतीचा अतिरिक्त पदभार देवून कारभार चालविण्यात येत आहे. अर्थात एक ग्रामसेवकाला त्यांच्या मागणी प्रमाणे दोन अधिक ग्रामपंचायतीचा अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे. ग्रामसेवक मात्र या बाबींचा फायदा उचलत आहेत. इकडच्या गांवकर्याना तिकडे असल्याचे सांगून वेळ मारून नेत आ...
error: Content is protected !!