Make Online Services More People-Oriented : Dilip Shinde : ऑनलाइन सेवा आणखी लोकाभिमुख करा : दिलीप शिंदे -NNL
नांदेड| पारदर्शिता ठेवतानाच अगदी वेळेत नागरिकांना माहिती देण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करा. जिल्ह्यामध्ये प्रत्येक सेवा ऑनलाईन होईल याकडे कटाक्ष ठेवा ऑनलाईन सेवा आणखीन लोकाभिमुख करा असे आवाहन राज्यसेवा हक्क आयोगाचे आयुक्त निवृत्त सनदी अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज येथे केले.
नांदेड जिल्ह्यातील राज्यसेवा हक्क आयोग अंतर्गत येणाऱ्या सेवांच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी ते या ठिकाणी आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज त्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे,उपजिल्हाधिकारी सामान्य अजय शिंदे यांच्यासह विविध विभाग प्रमुखांकडून जिल्ह्यातील गेल्या वर्षभरातील सेवांसंदर्भात आढावा घेतला.
आयोगाने सेवांची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला असून अधिकाधिक सेवा ऑनलाईन प...
