Make a pandan road : अनेक वर्षांपासून रखडलेला श्री परमेश्वर मंदिर ते खडकीकडे जाणारा पांदन रस्ता करून द्या
हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातील श्री परमेश्वर मंदिर हिमायतनगर पासून मौजे खडकी बाजार गावाकडे जाणारा (खडकी पांदन) (Make a pandan road) रस्ता चांगला व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी केली जात आहे. मात्र याकडे सर्वानीच दुर्लक्ष केल्याने या रस्त्यावरील शेतकऱ्यांनी आता नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची भेट घेऊन निवेदन देऊन सिमेंट काँक्रेट किंवा डांबरीकरण रस्ता करून द्यावा तसेच रोड़च्या बाजूने गावातील सांडपाणी जाण्यासाठी मोठी नाली बांधावी अशी मागणी केली आहे.
या मागणीला अनुसरून देण्यात आलेल्या निवेदात म्हंटले आहे कि, हिमायतनगर येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदीरापासून खडकी बाजार गावाकडे जाणारा (खडकी पांदन) रस्ता हा गाव नकाशावर पांदन रस्ता असून स्वातंत्र्यापासून आज पर्यन्त तयार करण्यात आलेला नाही. तसेच सदर पांदन रस्त्याने गावातील सांड पाणी दोन्हीकडेने वाहते त्यामुळे स...
