Prof. Kiran Kumar Johare : प्रा. किरणकुमार जोहरे यांना “महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार जाहीर -NNL
नाशिक| मराठा विद्या प्रसारक (मविप्र) समाज संस्थेच्या नाशिक येथील पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविदयालयातील इलेक्ट्रॉनिक सायन्स व कॉम्प्युटर सायन्स विभागात कार्यरत असलेले प्रा. किरणकुमार जोहरे यांना मुंबई व नांदेड येथील महात्मा कबीर समता परिषद यांचा शैक्षणिक व वैज्ञानिक संशोधन कार्याबद्दल सन २०२३-२४ चा मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार म्हणजे "महाराष्ट्रभूषण जीवन गौरव " पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना विनामोबदला हवामान अलर्ट व माहिती प्रा. जोहरे हे पुरवतात. मान्सून, चक्रीवादळ, विजा, गारा, ढगफुटी, महापूर, दुष्काळ आदी हवामानविषयक माहिती तातडीने देत पीक नियोजनाने कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फायदा त्यांनी हजारो शेतकऱ्यांना आतापर्यंत करून दिला आहे. गेल्या २० वर्षांपासून ग्रामीण शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि शेतीने राष्ट्रीय उत्...
